Thu. Jan 20th, 2022

काँग्रेसने उत्तर प्रदेशात प्रचार गुंडाळला

कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गाचे कारण देत पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसने शेवटच्या दोन आठवड्यांमध्ये अचानक प्रचार बंद केला आहे. काँग्रेसचे भावी अध्यक्ष राहुल गांधी यांना कोरोना झाल्याचे सांगण्यात आले. मात्र, निकालानंतर समोर आलेली बाब धक्कादायक होती. पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसने कोरोनाच्या आडून निवडणुकीतून अंग काढून घेतले आणि आपली मते तृणमूलकडे वळवली. आणि याचा परिणाम म्हणजे, पश्चिम बंगालमधून काँग्रेस संपली.

आता उत्तर प्रदेशातही काँग्रेस प्रचारापासून अचानक दूर झाली आहे. लडकी हूँ, लंड सकती हूँ असे म्हणत प्रचारात उतरलेल्या प्रियांका गांधी यांचे सार्वजनिक मेळावे रद्द करण्यात आले आहेत तर राहुल गांधी अद्यापही परदेशात सुट्टी घालवत आहेत. त्यामुळे, समाजवादी पक्षाला बळ देण्यासाठी उत्तर प्रदेशातही काँग्रेस स्वतःला संपवणार का? असा प्रश्न आता राजकीय विश्लेषकांकडून उपस्थित होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *