Sat. Aug 13th, 2022

लातूर जिल्हा बँकेवर कॉंग्रेसचे निर्विवाद वर्चस्व

  लातूल जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदाच्या निवडणूकीत काँग्रेसच्या सहकार पॅनेलला बहुमत मिळाले आहे. लातूर जिल्हा बँकेवर काँग्रसचे निर्विवाद वर्चस्व कायम राहिले असून ९ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसला आहे. ९ पैकी ८ जागांचा निकाल लागला असून त्यात काँग्रेसने बाजी मारत आठ जागांवर विजय मिळवला आहे.

  तसेच देवणी तालुक्यातील एका जागेवर भाजप आणि काँग्रेसच्या दोन्ही उमेदावारांना सारखेच मत मिळाल्याने या जागेसाठी चिट्ठी काढून मतदान झाले. त्यावर मात्र भाजपच्या उमेदवाराचे नशीब उघडले असून आता जिल्हा बँकेत १९ पैकी १८ जागांवर काँग्रेस विजयी झाली आहे. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांनी जल्लोष केला आहे.

विजयी उमेदवार

  • व्यंकटराव बिराजदार – कॉंग्रेस
  • अशोक गोविंदपूरकर – कॉंग्रेस
  • नागराळकर पाटील – कॉंग्रेस
  • पृथ्वीराज शिरसाठ – कॉंग्रेस
  • अनूप शेळके – कॉंग्रेस
  • सपना किसवे – कॉंग्रेस
  • अनिता केंद्रे – कॉंग्रेस
  • स्वयंप्रभा पाटील – कॉंग्रेस
  • भगवानराव पाटील तळीगावकर – भाजप ( देवणी )

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.