Mon. Aug 26th, 2019

कलम 370 हटवल्याने जम्मू-काश्मीरमध्ये पडणार असा फरक

0Shares

1952 पासून जम्मू काश्मीर राज्यात कलम 370 लागू आहे. त्यामुळे हे राज्य देशाच्या इतर राज्यांपेक्षा वेगळं होतं. वेगळे अधिकार या राज्याला मिळत होते. मात्र कलम हटवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतलाय. शिवाय जम्मू-काश्मीर आता केंद्रशासित प्रदेश असणार आहे.

#JammuAndKashmir: काय आहे कलम 35 A आणि कलम 370 ?

काश्मीरमधून कलम 370 हटवल्याने काय फरक पडणार आहे?

  1. जम्मू कश्मीरच्या जनतेकडे दुहेरी नागरिकत्व आहे ते संपणार.
  2. जम्मू काश्मीरला स्वतंत्र ध्वज राहणार नाही.
  3. जम्मू काश्मीरमध्ये राष्ट्रध्वजाचा अपमान हा गुन्हा मानला जात नाही, आता इतर राज्याप्रमाणे हा गुन्हा ठरणार आहे.
  4. सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय जम्मू काश्मीरच्या नागरिकांवर लागू होत नव्हते, आता सुप्रीम कोर्टाचे निर्णय बंधनकारक असणार आहेत.
  5. 370 या कलमानुसार संरक्षण, दळवळण आणि परराष्ट्र व्यवहार सोडून केंद्र सरकारला जम्मू- काश्मीर विधानसभेच्या मंजुरीशिवाय राज्यात कुठलेही कायदे लागू करता येत नव्हते. 370 हटवल्यामुळे आता केंद्राचे सर्व कायदे राज्यात लागू होतील.
  6. जम्मू- काश्मीर विधानसभेचा कार्यकाळ 6 वर्षाचा होता, आता इतर राज्याप्रमाणे कार्यकाळ 5 वर्षांचा होईल.
  7. जम्मू काश्मीरमध्ये हिंदू-शीख अल्पसंख्यकांना 16 टक्के आरक्षण मिळत नव्हतं, आता आरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा होईल.

 

काश्मीरप्रश्नी मोदी सरकारचा मास्टरस्ट्रोक, काश्मीरचा विशेष दर्जा संपणार

 

 

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *