Wed. Nov 13th, 2019

#JammuAndKashmir : कलम 35 अ हटवल्याने काय होणार?

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जम्मू-काश्मीर राज्याला स्वतंत्र दर्जा देणारे वादग्रस्त 370 कलम अंशत: हटवण्याचा प्रस्ताव राज्यसभेत सादर जम्मू-काश्मीर राज्याच्या पुनर्रचनेचा महत्त्वाचा प्रस्तावही राज्यसभेत करण्यात आला आहे. कलम 370 मधील अनुच्छेद क्रमांक 1 वगळून इतर सर्व अनुच्छेद हटवण्यात येणार असल्याचे गृहमंत्री अमित शाह यांनी राज्यसभेत सादर केला आहे.

कलम 35 अ हटवल्याने जम्मू काश्मीरमध्ये पुढील परिणाम होणार आहे-

1) यापूर्वी जम्मू- काश्मीरमध्ये 1954 पासून किंवा त्यापूर्वी 10 वर्षे राहत असलेल्या नागरिकांना जम्मू काश्मीरचा नागरीक मानलं जातं आणि त्यांना विशेष अधिकार मिळायचा. आता- आता देशातील  कुठलाही व्यक्ती जम्मू काश्मीरमध्ये राहू शकणार आहे.

2) पूर्वी राज्यात जमीन खरेदी, संपत्ती खरेदीचा अधिकार केवळ जम्मू काश्मीरच्या नागरिकांना आहे. केवळ या नागरिकांना सरकारी नोकऱ्या आणि इतर सर्व योजनांचा लाभ मिळायचा.

आता देशातील इतर नागरिकांना जम्मू काश्मीरमध्ये संपत्ती,जमीन खरेदी करता येईल,  शासकीय नोकरी, योजनांचा लाभ घेता येईल. उच्च शिक्षण घेता येईल.

3)  पूर्वी जम्मू काश्मीरच्या महिलेने इतर राज्याच्या नागरिकासोबत लग्न केलं तर तिचा संपत्तीवरचा अधिकार समाप्त होत असे.

आता 370 कलम हटल्यानंतर हा भेदभाव दूर होणार आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *