आपातकालीन सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या विचारात

कोरोना विषाणूमुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. यामुळे देशातील सर्व व्यवहार ठप्प झाला आहे. मात्र या लॉकडाऊनमधून अत्यावश्यक सेवांना वगळण्यात आलं आहे. राज्यात मागील काही दिवसांपासून अत्यावश्यतक सेवा देणारे शासकीय आणि खासगी कर्मचारी जीव धोक्यात घालून काम करत आहे.
या अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना राज्य सरकार प्रोत्साहनपर भत्ता देण्याच्या विचारात आहे. यासंदर्भात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्विट केलं आहे.
काय म्हणाले राजेश टोपे ?
शासकीय आरोग्य सेवेतील डॉक्टर्स,कर्मचारी वर्ग तसेच अन्य आपातकालीन सेवेतील कर्मचारी जीव धोक्यात घालून काम करीत आहेत. सेवा देत आहेत. त्यांचे अभिनंदन. अशी सेवा देणाऱ्यांना प्रोत्साहनपर भत्ता देण्याबाबत राज्य शासन विचार करीत असल्याचं ट्विट आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे.
देशात कोरोनाचा पादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोना विषाणूच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. ताज्या आकडेवारीनुसार भारतात कोरोना रुग्णांची संख्या एकूण 834 इतकी झाली आहे. तर कोरोनामुळे 19 जणांना जीवाला मुकावे लागले आहे. वरील आकडेवारी केद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.