Wed. Jan 26th, 2022

संविधान दिनाचे देशभरात उत्साह, पंतप्रधानांचे देशाला संबोधन

२६ नोव्हेंबर हा दिवस ‘संविधान दिन’ म्हणून साजरा केला जातो. तसेच हा दिवस ‘राष्ट्रीय कायदा दिवस’ म्हणूनही ओळखला जातो. त्यामुळे संविधान दिनानिमित्त भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधीत केले आहे.

भारताचे संविधान बनवण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मोलाचे योगदान आहे. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर करण्यासाठी आणि संविधानाच्या महत्त्वाचा प्रसार करण्यासाठी संविधान दिन साजरा केला जातो, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. यावेळी पंतप्रधानांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यांची आठवण करून दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ‘२००८मध्ये आजच्या संविधान दिनी मुंबईत दहशतवादी हल्ला झाला. त्यामुळे संपूर्ण देश हादरून गेला. या लढ्यात आपल्या भारतीय सैन्याने दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिले. मात्र लढ्यात भारतीय जवानांसह नागरिकांनी बलिदान दिले. त्यामुळे यासर्व वीरपुत्रांना अभिवादन करण्याचा हा दिवस आहे’, असे ते म्हणाले.

राज्यघटनेच्या माध्यमातून देश पुढे जात असल्याचे सांगत पंतप्रधानांनी विरोधकांवर हल्लाबोल केला आहे. १४ विरोधी पक्षांचा राज्यघटनादिनावर बहिष्कार टाकण्यात आला असल्याचे ते म्हणाले. तसेच राजकीय पक्षातील घराणेशाही लोकशाहीच्या विरोधात असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *