Sun. Sep 19th, 2021

कुलभूषण जाधव यांच्या भेटीला भारतीय दूतावासातील अधिकारी; पाकने दिली परवानगी

भारतीय नौदलातील अधिकारी कुलभूषण जाधव यांना भारतीय दूतावासातील अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी परवानगी दिली असल्याची माहिती समोर आली आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने ट्विट करत ही माहिती दिली आहे. 2017 साली पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर आता कुलभूषण जाधव यांना पहिल्यांदा भारतीय दूतावासातील अधिकाऱ्यांशी भेटण्याची परवानगी दिली आहे.

पाकिस्तानची नरमाईची भूमिका –

गेल्या अनेक वर्षांपासून हेरगिरी आणि दहशतवाद पसरवण्याच्या आरोपांवरून कुलभूषण जाधव यांना अटक केली आहे.

2017 साली लष्करी न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली होती.

त्यामुळे भारताने आतंरराष्ट्रीय न्यायालयाकडे धाव घेतली.

यावर आंतरराष्ट्रीय न्यायालयाने कुलभूषण जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेला स्थगिती दिली.

त्यानंतर आता पहिल्यांदा कुलभूषण जाधव यांना भारतीय दूतावासातील अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी मंजूरी दिली आहे.

पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते मोहम्मद फैसल ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे.

व्हिएन्ना करार, आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे आदेश आणि पाकिस्तानी कायद्यानुसार ही मदत देण्यात येत असल्याचे मोहम्मद फैसल यांनी सांगितले आहे.

जम्मू-काश्मीरमधील कलम 350 आणि कलम 35ए रद्द केल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाचे वातावरण आहे.

त्यानंतरही पाकिस्तानच्या या निर्णयामुळे पाकिस्तान नरमले असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *