ब्रिटन पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या फोटोमुळे वाद

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या एका फोटोमुळे ब्रिटनमध्ये वाद सुरू झाला आहे. मागील आठवड्यात भारत दौऱ्यावर असताना पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी ‘जेसीबी’वर बसून फोटो काढला होता. त्यामुळे ब्रिटनमध्ये विरोधक पंतप्रधान जॉन्सन यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत.
ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या भारत दौऱ्यानंतर ब्रिटनमध्ये नव्या वादाला तोंड फुटले आहे. बोरिस जॉन्सन यांनी भारत दौऱ्यादरम्यान जेसीबी कंपनीच्या कारखान्याला भेट दिली. त्यावेळी पंतप्रधान जॉन्सन यांनी जेसीबीवर बसत फोटो काढला. मात्र, जेबीसी ही ब्रिटनमधील जे. सी. बॅमफोर्ड एक्सकेवेटर या कंपनीच्या मालकीची आहे. त्यामुळे जॉन्सन यांच्या या फोटोविरोधात भारतीय वशांचे नाडिया व्हिटोम यांच्यासह मजूर पक्षाच्या खासदारांनी जॉन्सन यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. तसेच ब्रिटनच्या संसदेतही हा मुद्दा उपस्थित झाला असून विरोधक पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत.