औरंगजेबाच्या कबरीवर जाणे राजद्रोह – राम कदम

एमआयएमचे तेलंगणातील आमदार अकबरुद्दीन ओवैसी औरंगाबाद दौऱ्यादरम्यान गुरुवारी औरंगजेबाच्या कबरीचे दर्शन घेतले. मात्र, औरंगजेबाच्या कबरीचे अकबरुद्दीन ओवैसी यांनी दर्शन घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात नव्या वादाला तोंड फुटले आहे.
अकबरुद्दीन ओवैसी यांनी खुलाताबाद येथील औरंगजेबाच्या कबरीचे दर्शन घेतले. दरम्यान, याप्रकरणी भाजप आमदार राम कदम यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राम कदम म्हणाले, औरंगजेबाच्या कबरीवर जाणे म्हणजे राजद्रोह असल्याचे ते म्हणाले. त्यामुळे ओवैसींवर राजद्रोह लावण्याची मागमी राम कदम यांनी केली आहे. तसेच ओवैसींवर राजद्रोह लावण्याची तुमची हिम्मत तुमच्यातील साहस महाराष्ट्रातील छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांना पाहायचे आहे, असेही कदम म्हणाले.
अकबरुद्दीन ओवैसी यांनी गुरुवारी दुपारी खुलाताबाद येथील हजरत सय्यद जैनोद्दीन चिश्ती यांच्या दर्गेत जाऊन दर्शन घेतले. यावेळी परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दर्गेत गेल्यानंतर अकबरुद्दीन ओवैसी औरंगजेबाच्या कबरीस्थळी पोहचले. त्यांनी औरंगजेबाच्या कबरीवर फुले वाहिली. त्यानंतर त्यांनी अनेक दर्गांचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासोबत इम्तीयाज जलील, वारीस पठाण यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच त्यांना भेटण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.