Sun. Jun 20th, 2021

कोरोना व्हायरसचा फटका शेअर मार्केटला

कोरोना व्हायरसचा फटका शेअर मार्केटला देखील बसला आहे. शेअर मार्केटमध्ये घसरण झाली आहे. कोरोनामुळे शेअर मार्केटवर परिणाम झालेला पाहायला मिळत आहे.

गुरुवारी १२ मार्चला व्यवहाराच्या सुरुवातीलाच ही घसरण झाली आहे. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स हा २ हजार ४०० पेक्षा अधिक अंकांनी घसरला आहे. तर निफ्टीमध्ये ५०० अंकाची घसरण पाहायला मिळत आहे.

शेअर बाजार कोसळल्याने अनेक गुंतवणूकदारांना फटका बसला आहे.

भारताने जगाशी असलेला संपर्क कमी करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे पर्यटनाचं व्हिजा देण्याचं बंद करण्यात आलं आहे.

यामुळे विमान कंपन्यांचे शेअर असतील, तसेच त्या संबंधित कंपन्यांना फटका बसणार आहे.

या सर्व प्रकरणाचा फटका भारतीय अर्थव्यवस्थेवर होणार आहे. आधीच भारतीय अर्थव्यवस्था मंदीच्या गर्तेत सापडली आहे.

त्यामध्ये कोरोना विषाणूचा फटका बसला आहे. त्यामुळे आता शेअर बाजारात पुढं काय होतं, याकडे गुंतवणूकदारांच लक्ष असणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *