कोरोनामुळे आयपीएल क्रिकेट स्पर्धा पुढे ढकलण्याची शक्यता

कोरना व्हायरसने जगभरात हैदोस मांडला आहे. कोरोनामुळे हजारो लोकांना जीवाला मुकावे लागले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून अनेक मोठमोठे कार्यक्रम आणि महोत्सव रद्द करण्यात आले आहेत.
या कोरोना व्हायरसचा फटका आता आयपीएल क्रिकेट स्पर्धेला बसण्याची शक्यता आहे. कोरोना व्हायरसमुळे नियोजित आयपीएल क्रिकेट स्पर्धा 2020 पुढे ढकळण्याची शक्यता आहे.
जगात पसरलेल्या कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव पाहता, लोकांना गर्दीच्या ठिकाणांपासून दुर ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात येऊ शकतो, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले आहेत.
कोरोनामुळे गर्दीच्या ठिकाणी न जाण्याचं आवाहन जनतेला केलं जात आहे. आयपीएलचे सामने पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर क्रिकेटप्रेमी एकत्र येत असतात.
नियोजित वेळापत्रकानुसार आयपीएलच्या 13 व्या हंगामाला 29 मार्चपासून सुरुवात होणं अपेक्षित आहे.
दरम्यान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दीच्या ठिकाणी न जाण्याचं आवाहन सरकारच्या वतीने करण्यात येत आहे.
तसेच या कोरोनाच्या विषाणुमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांचा बांगलादेश दौरा रद्द करावा लागला आहे.