Fri. Sep 24th, 2021

ग्लासगो हवामान परिषदेचे अध्यक्ष आलोक शर्माशी केली मोदींनी चर्चा

अध्यक्ष व ब्रिटनचे खासदार आलोक शर्मा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांच्याशी हवामान बदलाच्या विषयातील बदलते प्रश्न व आव्हाने यावर चर्चा केली आहे. यूएन क्लायमेट चेंज कॉन्फरन्स ऑफ दी पार्टीज’ ही संस्था संयुक्त राष्ट्रांच्या वतीने हवामान बदलविषयक प्रश्न हाताळत असते. पंतप्रधान मोदी यांनी ट्विट संदेशात म्हटले आहे, की सीओपी २६ चे अध्यक्ष आलोक शर्मा यांच्याशी भारत व ब्रिटन यांच्यातील सहकार्याबाबत चर्चा झाली. ब्रिटनला या परिषदेसाठी आमच्या शुभेच्छा आहेत. हवामान बदलांवरची ही परिषद यशस्वी होण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. शिवाय शर्मा यांनी पंतप्रधान मोदी यांच्याशी हवामान बदलाबाबत सहकार्यावर चर्चा केली.

पंतप्रधान मोदी यांनी या वेळी पॅरिस करारास भारत बांधील असून सीओपी २६च्या संदर्भात सकारात्मकतेने काम करीत आहे असं स्पष्ट केलं आहे. शर्मा यांनी पंतप्रधान मोदी यांच्या डिसेंबर २०२० मधील ‘क्लायमेट अ‍ॅम्बिशन समीट’ या परिषदेतील भाषणाचा उल्लेख केला असून ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्यासमवेत आपण समन्वयाने काम करण्यास तयार आहोत, असं पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे. अक्षय ऊर्जेच्या क्षेत्रामधील कामाबाबात भारताचे शर्मा यांनी कौतुक केले आहे. शिवाय ब्रिटननेही कार्बन उत्सर्जन कमी करण्याबाबत वचनबद्धता दाखवली असल्याचं म्हटलं आहे. हवामान बदल क्षेत्रात काम करणारे देश, उद्योग व व्यक्ती यांच्या कार्याबाबतही शर्मा यांच्याशी मोदी यांनी चर्चा केली. शर्मा यांनी पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर व परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर यांच्याशीही देखील चर्चा केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *