Tue. Aug 3rd, 2021

शेतकऱ्याने मिळवलं 1 एकरातील कोथिंबिरीतून 40 दिवसांत 2 लाखांचं उत्पन्न!

लातूर जिल्ह्यात पावसाळ्यातील तब्बल दीड महिना उलटून गेला तरी समाधानकारक पाऊस झाला नाही. त्यामुळे दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झालीय. मात्र दुष्काळावर मात करत औसा तालुक्यातील बोरफळ येथील शेतकऱ्याने कोथिंबीर पिकातून 2 लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळवलाय. कोथिंबिरीला बांधावरच चांगला भाव मिळाल्याने शेतकरी आनंदी झालाय.

लातूर जिल्हयात भीषण दुष्काळ असताना औसा तालुक्यातील बोरफळ येथील सुगावे या शेतकऱ्याने पारंपरिक पिकाला फाटा देत 3 एकरात पाण्याचे योग्य नियोजन करत कोथिंबरीची लागवड केली होती.

अवघ्या 40 दिवसांमध्ये कोथिंबिरीचा 1 एकराचा फड 2 लाख 21 हजाराला व्यापाऱ्यांनी घेतल्यामुळे ऐन दुष्काळात बोरफळ येथील मच्छिंद्र सुगावे याना सुखद दिलासा मिळालाय.

25 हजाराचा खर्च वजा जाता सुगावा त्या 1 एकरात 2 लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळालाय.

बोरफळ शिवारात मछिंद्र सुगावे यांना 6 एकर जमीन आहे.

मात्र निसर्गाचा लहरीपणा आणि पारंपरिक पिकातून होत असलेली घटत यामुळे सुगावे त्रासले होते.

यावर त्यांनी जालीम पर्याय शोधत बाजारभावाचा अभ्यास करून कोथिंबिरीची लागवड केली होती.

लागवडीपासून फवारणी, मशागत यावर सुगावे यांनी अथक परिश्रम केले.

याचंच फलित म्हणून आज त्यांच्या कोथिंबिरीला योग्य दर  मिळाला आहे.

आत्तापर्यंत जे पारंपरिक पिकातून उत्पन्न मिळालं नाही ते 40 दिवसाच्या कोथिंबिरीतून मिळालं असल्याचे समाधान त्यांनी व्यक्त केलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *