Tue. Dec 7th, 2021

सावधान, २०२१च्या सुरवातीला कोरोना स्फोट!

जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा

२०२१ च्या सुरुवातीलाच कोरोना रुग्णसंख्येचा विस्फोट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नाताळाच्या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेने सर्व सामान्यांसाठी दिल्या आहेत काही सूचना.

जागतिक आरोग्य संघटनेनं (डब्यूएचओ) बुधवारी जारी केलेल्या एका इशाऱ्यामध्ये युरोपीयन देशांमध्ये करोनाचा प्रादूर्भाव वाढत असल्याचं म्हटलं आहे. डब्यूएचओने नाताळ साजरा करताना लोकांनी मास्क घातलं नाही आणि सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळले नाही, तर युरोपीयन देशांमध्ये करोनाचे संकट अधिक गंभीर होऊ शकतं, असंही म्हटलं आहे. लोकांनी नाताळानिमित्त चर्चमध्ये जाताना किंवा पार्ट्यांना जाताना मास्क नाही घातले तर नवीन वर्षामध्ये करोनाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होऊन रुग्णसंख्येचा विस्फोट झाल्याचे पहायला मिळू शकतं असा धोक्याचा इशाराही डब्ल्यूएचओनं दिला आहे.

डब्यूएचओने ब्रिटन, इटली, स्पेन, जर्मनी आणि फ्रान्ससारख्या देशांना नताळाच्या कालावधीमध्ये करोनासंदर्भातील नियमांचे काटेकोरपणे पालन केलं जाईल याकडे विशेष लक्ष देण्याच्या सूनचा केल्याचं असोसिएट फ्री प्रेसने म्हटलं आहे. नाताळाच्या कालावधीमध्ये किती लोकांनी एकत्र यावे यासाठी नियम करावेत, एका ठिकाणी जास्त लोकांनी गर्दी होणार नाही हे पहावे असंही डब्यूएचओने या देशांना सांगितलं आहे. नाताळानिमित्त कोणाला पार्टी करायची असल्यास मोकळी मैदाने, घराचं अंगण आणि उघड्या जागांना प्राधान्य द्यावे. बंद जागी अनेकांनी भेटणं धोकादायक ठरु शकतं, असंही डब्यूएचओ आपल्या इशाऱ्यामध्ये म्हटलं आहे. हवा खेळती असणाऱ्या ठिकाणांना प्राधान्य दिल्यास संसर्गाचा धोका कमी आहे असंही डब्यूएचओने नमूद केलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *