Sun. Sep 19th, 2021

कर्जमाफी योजनेच्या ‘आंगठ्याला’ कोरोनाचे सावट

महाविकास आघाडी सरकारच्या महत्वाकांक्षी असलेल्या कर्जमाफी योजनेवरही कोरोनाचे सावट आले आहे. कोरोनाचं संक्रमण होऊ नये यासाठी आता आधार केंद्रांना सावधगिरी बाळगण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

आधार प्रमाणिकरणासाठी शेतकऱ्याच्या अंगठ्याने प्रमाणीकरण करावे लागते.

यामुळे आता केंद्रांना मशीनसह शेतकऱ्यांना सॅनिटाईज करण्याच्या सूचना देण्यात आल्या .यामुळे आता कर्जमाफी योजनेची गती मंदावली आहे.

कोरोना व्हायरसमुळे सध्या सर्वच शासकीय कार्यालयातील बायोमेट्रिक बंद करण्यात आले आहे.मात्र कर्जमाफी योजना शेतकऱ्यांसाठी महत्वाची असल्याने सावधानी बाळगण्याच्या सूचना सरकारकडून देण्यात आल्या आहे.

जिल्ह्यात कर्जमाफी योजनेच्या दोन याद्या जाहीर करण्यात आल्या आहे. यात ४६,४२४ शेतक-यांची नावे जाहीर करण्यात आली आहे.

यापैकी ३७,०२० शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण झाले असून ९४०० शेतकऱ्यांचे प्रमाणीकरण बाकी आहे.जिल्ह्यात १५४० आपले सरकार केंद्रावर ही प्रक्रिया सुरु आहे.

शासनाकडून आलेल्या सूचनेनुसार शेतकऱ्यांचा आंगठा घेण्यापूर्वी शेतकऱ्यांच्या हातांची सफाई करणे, थम मशीनला सॅनिटाईज करणे, आधार केंद्रावर सॅनिटाईजेशनचे मशीन उपलब्ध करणे, केंद्रावर कार्यरत कर्मचाऱ्यांना सर्दी खोकला असल्यास त्याला केंद्रावर न येण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *