Fri. Jan 21st, 2022

‘बगाड’ यात्रेवर कोरोनाचं सावट

राज्यभरात रंगपंचमी विविध रंगांनी साजरी केली जाते.मात्र याच दिवशी सातारा जिल्ह्यातील बावधन हे गाव गुलाबी रंगानी न्हाऊन निघतं. कारण आहे या गावची ‘बगाड’ यात्रेचं. सध्या याच बगाड यात्रेवर कोराना व्हायरसचं सावट घोंगावत आहे यामुळे बगाड यात्रेला भाविकांची अल्पप्रमाणात गर्दी दिसत आहे.

वाई तालुक्यातील ‘बावधन’चे बगाड हे राज्यात प्रसिद्ध आहे. हजारो भाविक दरवर्षी अनोखी बगाड यात्रा पाहण्यासाठी वाई गावापासून जवळच असणाऱ्या बावधन गावाला येत असतात. साडे तीनशे वर्षापासून या गावात ही यात्रा साजरी केली जाते 20 फूट उंच बगाड गावापासून 5 किलोमीटर लांब असणाऱ्या सोनेश्वर मंदिरापर्यंत बैलांच्या मदतीने हे बगाड ओढले जाते यावेळी मोठ्या प्रमाणात भाविक ही यात्रा पाहायला येतात.

सध्या देशात कोरोना व्हायरसचा शिरकाव झाल्यामुळे याचा फटका अनेक यात्रांना बसत आहे. याचा परिणाम आज पार पडलेल्या बावधनच्या बगाड यात्रेवर दिसून आला. यावर्षी भाविकांची संख्या ही मागील वर्षी पेक्षा कमी प्रमाणात दिसत आहे. जिल्हा प्रशासनाने यात्रा, महोत्सव अश्या सार्वजनिक कार्यक्रमावर कोरोनाचा संसर्ग होऊ नये याकरिता प्रतिबंध केले आहेत. याची भाविकांनी देखील धास्ती घेतली असून भाविकांनी तोंडावर मास्क, हातरुमालाचा वापर केलेला पहायला मिळत आहे.

यावर्षी 20 फुटी बगाडाला नवस फेडण्याचा मान मनोज नायकवडी यांना मिळाला असून बगाड्या भक्तास 20 फुटी लाकडी बगाडाला बांधले जाते. संपूर्ण लाकडापासून तयार केलेल्या बगाडाला शेतातून बैलांच्या जोडीनी ओढत पळवत नेऊन दोनच्या सुमारास या बगाडाचा कार्यक्रम आटपून ग्रामस्थांनी प्रशासनाला सहकार्य केलं आहे.

या यात्रेची तयारी पंधरा दिवसापासून सुरू असते. यात्रा काळात मोठ्या प्रमाणात भाविक या यात्रेस येतात. यावेळी कोणतेही गालबोट लागू नये, यासाठी पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात येतो. मात्र हा बगाडाच्या सोहळ्यात या कोरोनाचा संसर्ग होऊ नये याकरिता प्रतिबंध केले आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *