Sun. May 16th, 2021

कोरोनाचा परिणाम नाशिकच्या पर्यटनावर

कोरोनामुळे अनेक गोष्टीवर परिणाम झालं असताना याचा फटका नाशिकच्या पर्यटन व्यवसायाला देखील बसला आहे. नाशिक हे एक ऐतिहासिक तीर्थक्षेत्र आहे. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होत असते. रामकुंड आणि पंचवटी परिसरात भाविकांची मोठी गर्दी असते.

मात्र गेल्या काही दिवसांपासून कोरोना व्हायरसच्या भीतीमुळे भाविकांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. याचा परिणाम या परिसरात असलेल्या छोट्या मोठ्या व्यावसायिकांवर झाला आहे. नाशिकला येणाऱ्या भाविकांमध्ये 15 ते 20 टक्के घट झाल्याची माहिती पुरोहित संघाच्या वतीने देण्यात आलंय.

कोरोना संदर्भात सरकार आणि प्रशासन योग्य ते उपाययोजना करत आहेत. मात्र सोशल मीडियातून मोठ्या प्रमाणात अफवा पसरत असल्याने भाविक भीतीपोटी घराबाहेर पडत नसल्याचंही दिसून येतंय.

नाशिकच्या रामकुंड भागात अनेक महत्त्वाच्या विधी रोज पार पडत असतात त्यामुळे भाविकांची गर्दी या परिसरात मोठ्या प्रमाणात होत असते मात्र कोरोनामुळे या परिसरातील गर्दी खूप कमी झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *