Fri. Jul 10th, 2020

फक्त 11 रुपयांत Corona Virus पळवणारा ‘कोरोनावाले बाबा’ अटक

कोरोना व्हायरसची भीती सध्या जगभरात आहे. ठिकठिकाणी कोरोनाचे संशयित आढळल्यावर त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. मात्र या ही परिस्थितीत अफवांचं पीक उगवतंय, कोरोनावरून टिंगल टवाळी होतेय आणि आतातर कोरोना पळवून लावणाऱ्या भोंदूबाबांनी बाजारही मांडायला सुरुवात केली आहे. लखनऊमध्ये अशाच एका कोरोना बाबाला पोलिसांनी अटक केली आहे

एकीकडे कोरोनाच्या भीतीने hand Sanitizers आणि मास्क्स महागले असताना अवघ्या 11 रुपयांत कोरोनाला पळवण्याचा दावा करणाऱ्या भोंदू बाबाला वजीरगंज येथे पोलिसांनी अटक केली आहे. अहमद सिद्दिकी असं या ढोंगी बाबाचं नाव आहे. त्याने आपल्या दुकानाबाहेर कोरोना संदर्भात बोर्ड लावला होता.

जे लोक मास्क्स विकत घेऊ शकत नाही, त्यांनी आपल्याकडील सिद्ध केलेला ताविज विकत घ्यावा. अवघ्या 11 रुपयांत मिळणाऱ्या ताविजमध्ये तिलिस्मी जादू असून हा ताविज बांधल्यास Corona Virus चा संसर्ग होत नाही.

या संदर्भात पोलिसांनी CMO कडून माहिती मिळाली. त्यानंतर वजीरगंज पोलिसांनी कारवाई करत अहमद सिद्दिकीला अटक केली. फसवणुकीचा गुन्हा त्याच्यावर दाखल करण्यात आलाय. लखनऊमध्ये देखील 2 कोरोनाचे दोन रुग्ण आढळून आले आहेत. NOIDA येथे एका खासगी कंपनीत कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले होते. त्यानंतर 707 कर्मचाऱ्यांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *