Wed. Jan 19th, 2022

राज्यासाठी दिलासादायक बातमी!

राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढतच असून दररोज मोठ्या संख्येने कोरोनाबाधित आढळून येत आहेत. मात्र एकीकडे ही परिस्थिती असताना दुसरीकडे कोरोनातून बरे होणाऱ्यांची संख्या देखील वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे.

राज्यात शनिवारी ८२ हजार २६६ रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर ५३ हजार ६०५ नवीन कोरोनाबाधित आढळले असून ८६४ रूग्णांचा मृत्यू झाला आहे.

राज्यात आजपर्यंत एकूण ४३,४७,५९२ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८६.०३ टक्के झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.४९ टक्के एवढा आहे. राज्यात एकूण ६,२८,२१३ सक्रीय रुग्ण आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *