Sun. Oct 17th, 2021

#Corona : राज्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा शंभरीपार

चीनमधून जगभरात पसरलेला कोरोना विषाणूने हाहाकार माजवला आहे. देशासह राज्यातदेखील कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. तसेच राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या आकड्याने शंभरीपार केली आहे. याबाबतचे माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली आहे.

राज्यात आता आणखी ४ नवे रुग्ण सापडलेत. त्यामुळे कोरोनाग्रस्तांचा आकडा १०१ वर गेला आहे. नव्याने आढळलेल्या रुग्णांमधील एक तरुण पश्चिम महाराष्ट्रातील साताऱ्यातील असल्याचं कळत आहे.

दरम्यान राज्यात सोमवारी संध्याकाळनंतर कोरोनाचे नवे ८ रुग्ण सापडले होते. कोरोनाग्रस्त रुग्णांचा वाढता आकडा हा चिंता वाढवत आहे. राज्य सरकारकडून कोरोनाला आळा घालण्यासाठी उपाययोजना घेतली जात आहे.

कोरोनाग्रस्त रुग्णांची शहरनिहाय आकडेवारी

मुंबई – ४०
ठाणे – २
नवी मुंबई – ३
पनवेल – १
कल्याण – ५
उल्हासनगर – १
रत्नागिरी – १
पुणे – १९
पिंपरी चिंचवड – १२
सांगली – ४
सातारा – २
अहमदनगर – २
औरंगाबाद – १
नागपूर – ४
यवतमाळ – ४

दरम्यान सरकारच्या आवाहनानंतरदेखील रस्त्यावरील गर्दी ओसरत नव्हती. त्यामुळे सोमवारी मुख्यमंत्र्यांनी राज्यात संचारबंदी लागू केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *