Wed. Jun 16th, 2021

#Corona : ओस पडलेल्या रेल्वे स्टेशनवर क्रिकेटपटू युजवेंद्र चहल काय करतोय ?

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. बससेवा, रेल्वेसेवा खंडित करण्यात आल्या आहेत. मात्र असं असताना देखील इंडियाचा खेळाडू युजवेंद्र चहलचा ओस पडलेल्या रेल्वे स्टेशनवरील फोटो व्हायरल होत आहे.

या व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये युजवेंद्र चहल हा पादचारी पुलावर झोपलेला पाहायला मिळतोय. रेल्वे स्टेशनवर झोपलेला फोटो नेटीझन्सला आवडलेला दिसतोय.

या फोटोमध्ये चहल डोंबिवली रेल्वे स्टेशनवर झोपलेला आहे.

व्हायरल झालेला मूळ फोटो हा २०१९ वर्ल्ड कप दरम्यानचा आहे. टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका यांच्यातील ४४वा साखळी फेरीतील हा सामना होता. युजवेंद्र चहलचा प्लेइंग-११मध्ये समावेश केला नव्हता.

त्यामुळे तो पिवळ्या रंगाची टीशर्ट घालून बाऊंड्री लाईनच्या बाहेर बसलेला होता. त्याच्या जवळ ड्रींक होत्या. तसेच चहल हा हातपाय पसरवून झोपलेला पाहायला मिळाला होता. यानंतर चहलचा हा फोटो फार व्हायरल झाला होता.

फिरकीपटू युजवेंद्र चहलला क्रिकेटमध्ये येण्याआधी चेसचं वेड होतं. चहलने जागतिक युवा बुद्धिबळ अजिंक्यस्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. चहलने टीम इंडियासाठी आतापर्यंत एकूण ५२ वनडे, ४२ टी-२० सामन्यात टीम इंडियाचं प्रतिनिधित्व केलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *