Mon. Jan 17th, 2022

corona : कोरोना संशयितांची नावं उघड करणाऱ्या मनसे उपाध्यक्षावर गुन्हा

राज्यात एका ठिकाणी कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री जोर लावत आहेत. दुसऱ्या बाजुल जनतेला कोरोनाला घाबरुन न जाण्याचं आवाहन केलं जात आहे. सरकारने केलेल्या आवाहनाला उत्तम प्रतिसाद देत आहे.

मात्र दुसऱ्या ठिकाणी मनसेच्या उपाध्यक्षाने कोरोना संशयिताची नावं उघड केली आहेत. संजीव पाखरे असं या उपाध्यक्षाचं नाव आहे.

त्यामुळे या उपाध्यक्षावर गुन्हा दाखल केला आहे. संजीव पाखरे यांच्यावर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

कोरोना संशयित तसेच कोरोनाग्रस्तांची नावं गुपित ठेवण्याचं आवाहन राज्य सरकार तसेच अनेक जिल्हाधिकाऱ्यांनी केलं होतं. मात्र संजीव पाखरे यांनी हे सर्व आदेश धाब्यावर बसवत संशयितांची नाव उघड केली.

अहमदनगरमधील रुग्णालयात विलिगकरण कक्षाच तीन रुग्णांना दाखल केलं होतं. पण या तिघांनी रुग्णालय कर्मचाऱ्यांच्या नकळत पळ काढला.

या तीनही रुग्णांच्या शोधासाठी नावानिशी पत्र तयार केलं गेलं. तोपर्यंत ते तीनही रुग्ण हॉस्पीटलमध्ये पोहचले. पण तेव्हापर्यंत हे पत्र मोठ्या प्रमाणात व्हायरल झालं.

यासंपूर्ण प्रकरणी हॉस्पीटलमधील एका कर्मचाऱ्याने फिर्याद केली. या फिर्यादीची अहमदनगरच्या जिल्हाधिकारी असलेल्या राहुल द्विवेदी यांनी दखल घेतली. यानंतर याप्रकरणी पोलिसांना चौकीशी करण्याचे आदेश देण्यात आले.

या आदेशानंतर पोलिसांनी सखोल तपासाला सुरुवात केली. सायबर सेल विभागाने तपासणी केली. या तपासणीत पुण्यातील मनसे उपाध्यक्ष संजीव पाखरे यांचं नावं समोर आलं.

म्हणजेच कोरोना संशयितांची नावं संजीव पाखरे यांनी उघड केलं असल्याचं समोर आलं. यानुसार बुधवारी रात्री गुन्हा दाखल केला. आपात्कालीन व्यवस्थापन कायद्यानुसार या गुन्ह्याची नोंद केली आहे.

दरम्यान राज्यातील कोरानग्रस्तांचा आकडा हा वाढत चालला आहे. कोरोनाग्रस्तांचा आकडा हा आता ४७ वर पोहचला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *