Sat. Nov 27th, 2021

देशात गेल्या २४ तासांत सर्वाधिक मृत्यूंची नोंद

भारतात रुग्णसंख्येत थोड्या प्रमाणात घट झाल्याने दिलासा मिळाला असतानाच पुन्हा एकदा काळजी वाढवणारी आकडेवारी समोर आली आहे. देशात गेल्या २४ तासांत आतापर्यंतच्या सर्वाधिक मृत्यूंची नोंद झाली आहे.

गेल्या २४ तासांत ३२९३ रुग्णांनी आपला जीव गमावला असून हा आतापर्यंतचा उच्चांक आहे. गेल्या २४ तासांत ३ लाख ६० हजार ९६० नव्या कोरोनारुग्णांची नोंद झाली आहे. आरोग्य मंत्रालयाकडून ही आकडेवारी देण्यात आली आहे.

देशातील एकूण कोरोना रुग्णसंख्या १ कोटी ७९ लाख ९७ हजार २६७ इतकी झाली आहे, तर दुसरीकडे ३२९३ रुग्णांच्या मृत्यूमुळे एकूण मृत्यू झालेल्यांची संख्या २ लाख १ हजार १८७ वर पोहोचली आहे. दरम्यान देशात गेल्या २४ तासात २ लाख ६१ हजार १६२ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. आतापर्यंत १ कोटी ४८ लाख १७ हजार ३७१ जणांनी कोरोनावर मात केली आहे.

संपादन: सिद्धी भरत पाटील

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *