Thu. Jan 27th, 2022

कोरोना असूनही पर्यटक जोमात

सिंधुदुर्ग : सह्याद्रीच्या कुशीत विसावलेला बाबा धबधबा हा सह्यादीच्या कुशीतून सुमारे २०० ते २५० फुटापेक्षा अधिक उंचीवरून मनमुराद कोसळतो . हा धबधबा आपल्या डोक्यावरून खाली कोसळतो कारण या धबधब्यांच्या खाली गुहा आहे , त्यामुळे धबधबा समोरून कोसळताना पहाण हा एक वेगळा अनुभव पर्यटकाना ठरतो . सध्या सिंधुदूर्ग जिल्ह्याचा पॉझिव्हीटी रेट तिसऱ्या क्रमांकावर आहे. सलग दुसऱ्या वर्षी ही कोरोनाचे संकट असल्याने वर्षा पर्यटन बंद आहे तरी पण या बाबा धबधब्यावर कोल्हापूर गोवा बेळगाव येथून शेकडो पर्यटक येत आहेत त्यांना जणू कोरोनाचा विसरच पडला आहे .

ना मास्कचा वापर .. ना सोशल डिस्टनचा त्यामुळे प्रशासनाने खबरदारी घेणे गरजेचे आहे मात्र गोवा व कर्नाटक मधून महाराष्ट्रात पर्यटक येताना आर टी पी सी आर अनिवार्य असताना पर्यटक सिंधुदूर्ग मधील पर्यटन स्थळावर कसे येतात याबाबत गांभीर्याने लक्ष प्रशासनाने देणे गरजेचे आहे याचा आढावा आमचे प्रतिनिधी सुरेश कौलगेकर यांनी घेतला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *