औरंगाबादमध्ये पेट्रोलपंपवर मिळणार कोरोनावरील लसी

कोरोना काळात केवळ लसीकरण हा एकमेव पर्याय सर्वांसमोर उपलब्ध आहे. तसेच राज्यात प्रशासनाकडून कोरोना लस घेण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात येत आहे. अशातच आता औरंगाबादमध्ये पेट्रोल पंपवर नागरिकांना कोरोना लस देण्यात येणार आहे.
औरंगाबादमध्ये लसीकरण होण्यासाठी टनो वॅक्सिन, नो पेट्रोलट असे आदेश काढले होते. त्यामुळे पेट्रोल घेणाऱ्या प्रत्येक नागरिकांना कोरोना लस घेणे बंधनकारक केले होते. ज्या नागरिकांनी लस घेतली नाही अशा नागरिकांना पेट्रोल मिळणार नाही असे आदेश औरंगाबादमध्ये काढण्यात आले होते. त्यामुळे आता ज्या वाहनधारकांनी लस घेतली नाही अशा लोकांना आता पेट्रोल पंपावर लस मिळणार आहे.
औरंगाबाद शहरातील पेट्रोल पंपवर नागरिकांसाठी लसीकरण केंद्रे उभारण्यात आले आहेत. त्यामुळे पेट्रोल घेण्यासाठी येणाऱ्या नागरिकांनी कोरोना लस घेतली नाही तर त्यांना पेट्रोलपंपवरच कोरोना लस देण्यात येणार आहे.