Thu. Oct 21st, 2021

कोरोना गो गो, कोरोना च्या आयचा घो, आठवलेंची कोरोना स्पेशल कविता

जगावर कोरोनाने थैमान घातलं आहे. कोरोनाग्रस्त रुग्णांच्या आणि मृतांच्या आकड्यात वाढ होतेय. त्यामुळे राज्यात आणि देशामध्ये नकारात्मकतेचं वातावरण आहे.

पण असं असतानाही मात्र केंद्रीय राज्यमंत्री असलेल्या रामदास आठवले यांनी आपल्या नेहमीच्या हटके शैलीत कविता करुन थोड्या वेळे लोकांच्या चेहऱ्यावर हसू आणलं आहे.

आठवलेंनी गुढीपाडव्यानिमित्त एक खास कविता केली आहे. त्यांनी ही कविता ट्विटरवरुन शेअर केली आहेत.

अशी आहेत कवितेची वाक्य

अब आप बिलकुल मत रोना
14 एप्रिल के बाद चला जायेगा कोरोना!
कोरोना से मत डरोना
कोरोना को जलदी मारोना
कोरोना ने दुनिया को दिया है धोका
हम करेंगे उसका खोका
कोरोना गो गो ; कोरोना गो गो
कोरोना च्या आयचा घो घो घो!

आज आहे गुढी पाडवा
कोरोना ला आडवा
आणि सर्वांनी इतिहास घडवा!

आठवलेंनी यानंतर आणखी एक कविता केली आहे. या कवितेच्या माध्यामातून त्यांनी जनतेला घरी राहण्याच आवाहन केलं आहे. तसेच या कवितेच्या माध्यमातून रामदास आठवले यांनी मोदींच्या लॉकडाऊनच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे.

कोरोना आला आहे आपल्या दारी
आपण थांबा आपल्या घरी
आता करू नका कोणी पंढरीची वारी
नरेंद्र मोदींचा लॉक डाऊन निर्णय आहे लय भारी
नरेंद्र मोदींनी दिलेला आदेश पाळा
घराच्या बाहेर जाणे टाळा
कोरोना व्हायरस ला घाला आळा
कोरोनाला दिसेल तिथे जाळा
जान है तो जहान है
लाईफ अपना महान है

रामदास आठवले यांनी काही दिवसांपूर्वी परदेशी नागरिकांसोबत कोरोनाला हाकलून लावण्यासाठी ‘कोरोना गो, गो कोरोना’ अशा घोषणा दिल्या होत्या. आठवलेंचा हा घोषणा देतानाचा व्हिडिओ फार व्हायरल झाला होता.

दरम्यान रामदास आठवले आज २५ मार्चला दुपारी ४ वाजता जनतेशी संवाद साधणार आहेत. याद्वारे ते कोरोनाविषयी जनजागृती करणार आहेत. तसेच 14 एप्रिल रोजी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती याबाबत जनतेशी संवाद साधणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *