Wed. Jun 29th, 2022

देशात पुन्हा कोरोना वाढ

Microscopic illustration of the spreading 2019 corona virus that was discovered in Wuhan, China. The image is an artisic but scientific interpretation, with all relevant surface details of this particular virus in place, including Spike Glycoproteins, Hemagglutinin-esterase, E- and M-Proteins and Envelope.

देशात पुन्हा कोरोनाने डोकं वर काढलं आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे देशात कोरोनाच्या चौथ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येने पुन्हा एकदा देशाची चिंता वाढली आहे. बुधवारी देशात कोरोनाच्या ३ हजार ३०३ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. या आकड्यासह देशातील सध्याची सक्रिय रुग्णांची संख्या वाढून १६ हजार ९८०वर पोहोचली आहे.

देशातील वाढती कोरोना रुग्णसंख्येमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्र्यांसोबत दूरदृश्यप्रणालीद्वारे बैठक घेतली. या बैठकीत कोरोना  संक्रमणाबाबत सावध रहाण्याचा इशारा दिला. तसेच, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात पुन्हा बंधने नको असतील तर कोरोनाबाबत स्वयंशिस्त पाळण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे.

कोरोना रुग्णवाढ

दरम्यान, देशात पुन्हा दैनंदिन कोरोना रुग्णसंख्येने तीन हजारांचा आकडा पार केला आहे. बुधवारी देशात ३ हजार ३०३ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर २ हजार ५६३ नागरिकांनी कोरोनावर मात केली आहे. तसेच ३९ रुग्णांनी कोरोनामुळे जीव गमावला आहे. त्यामुळे देशात कोरोनावर उपचार घेणाऱ्यांची संख्या १६ हजार ९८० इतकी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.