Wed. Jun 29th, 2022

कोरोनावर संयम आणि सतर्कता राखून विजय मिळवू – आरोग्यमंत्री

राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील जनतेशी फेसबुक लाईव्हद्वारे संवाद साधला. यावेळेस त्यांनी डॉक्टर आणि पॅरामेडिकल स्टाफ आणि परिचारिकांच त्यांनी अभिनंदन केलं. त्यांचे आभार मानले. जीव धोक्यात घालून जोखीम घेऊन काम करत आहेत. यासाठी आरोग्यमंत्र्यांनी आभार मानले.

यावेळेस त्यांनी कोरोना व्हायरसबद्दल राज्यातील परिस्थितीची माहिती दिली. तसेच त्यांनी यावेळेस जनतेला रक्तदान करण्याबाबतचं आवाहन केलं. मात्र सुरु असलेली टाळेबंदीचं उल्लंघन न करता रक्तदान करण्याचं आवाहन केलं.

#Corona : शरद पवारांचा जनतेशी संवाद

काय म्हणाले आरोग्यमंत्री ?

 • पोलीस आणि नागरिकांना या काळात परस्पर सामंजस्यानं काम करावं.
 • मीच माझा रक्षक, मी घरी थांबणार, मी कोरोनावर विजय मिळवणार.
 • कोरोनावर संयम आणि सतर्कता राखून विजय मिळवू.
 • भाजीपाल्यासाठी होणारी गर्दी टाळा.
 • ट्रेसिंग, टेस्टींग आणि ट्रीटमेंटवर भर देणार.
 • प्रशासनाने सर्वतोपरी मदत करून जीवनावश्यक वस्तू पोहोचवाव्यात.
 • सोशल डिस्टन्सिंग नियम पाळा.
 • घरपोच सेवा देण्याचा प्रयत्न व्हावा, सर्वपक्षीय कार्यकर्त्यांना मदतीचं आवाहन.
 • कोरोनासाठी सर्व उपचार देतो आहोत.
 • केंद्र सरकार आणि तज्ञ डॉक्टरांच्या सूचनांवरून उपचार.
 • रूग्ण लवकर बरे होतील असा विश्वास.
 • प्रवासी रूग्णांना बंदी असल्यानं वाढ होणार नाही.
 • सर्व मेडिकल वर्कर्सना अत्यावश्यक मास्क दिले जात आहेत.
 • मात्र अन्य कर्मचा-यांनी साधारण मास्क वापरायला हरकत नाही.
 • सीएसआरच्या माध्यमातून अत्यावश्यक मास्क निर्मिती कऱणार.
 • रक्त अऩेक उपचारांमध्ये आवश्यक असतं. रक्ताचा साठा आवश्यक.
 • रक्तदान शिबीरांना अडवू नये, जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिका-यांना सूचना.
 • सोशल डिस्टन्सिंग पाळून रक्तदान व्हावेत.
 • हृदय रोग्यांना आणि अन्य रूग्णांना उपचार मिळावेत, राज्याच्या रक्तपेढीची विनंती.
 • रक्त तुटवडा निर्माण होण्याची शक्यता, रक्तदान व्हायला हवं.

दरम्यान याआधी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राज्यातील जनतेशी फेसबुक लाईव्हद्वारे संवाद साधला. यावेळेस शरद पवार यांनी कोरोनासंदर्भात अनेक मुद्द्यांवर संवाद साधला. तसेच जनतेने विचारलेल्या प्रश्नांची उत्तर दिली.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.