corona : जनता कर्फ्यूमुळे रविवारी १००० उड्डाणं रद्द

इंडिगो आणि गोएअरने जनता कर्फ्यूला पाठिंबा दिलाय. गोएअरने २२ मार्चची सर्व उड्डाणं रद्द केली आहेत. इंडिगोची फक्त ४० टक्के उड्डाण होणार आहेत. या दोन्ही कंपन्यांनी घेतलेल्या निर्णयामुळे जवळपास अंदाजे हाजार एक उड्डाणं रद्द होणार असल्याचा अंदाज आहे.
उड्डाण रद्द केल्याने तिकीटाची रक्कम परत मिळणार की नाही, याबाबत प्रवाशी संभ्रमात आहे. इंडिगो आणि गोएअरने अद्याप रद्द केलेल्या उड्डाणाची तिकीटाची रक्कम परत करण्याबाबतची कोणतीही माहिती दिलेली नाही.
कोरोना रोखण्यासाठी पंतप्रधानांनी रविवारी २२ मार्चला जनता कर्फ्युची घोषणा केली आहे. या जनता कर्फ्यू दरम्यान सकाळी ७ ते रात्री ९ पर्यंत घराबाहेर न पडण्याचं आवाहन करण्यात आलंय.
#Corona : देशात 22 मार्चला जनता कर्फ्यूसह रेल्वेसेवा बंद राहणार
जनता कर्फ्यूच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने देखील मोठा निर्णय घेतला आहे. रेल्वे प्रशासनाने एकूण २ हजार ४०० रेल्वे गाड्या रद्द केल्यात. या निर्णयाची अंमलबजावणी २१ मार्चच्या मध्यरात्रीपासून ते २२ मार्चच्या रात्री १० पर्यंत होणार आहे.
रविवारी सकाळी ४ पासून ते रात्री १० पर्यंत म्हणजेच एकूण १८ तासांच्या कालावधीत १ हजार ३०० गाड्या खंडीत केल्यात. या १ हजार ३०० गाड्या इंटरसिटी गाड्या आहेत.
एक्सप्रेस रद्द, मात्र लोकल सुरुच
जनता कर्फ्यूमुळे अनेक एक्सप्रेस आणि इंटरसिटी गाड्या रद्द केल्या आहेत. मात्र या लोकल रेल्वे सेवा सुरु असणार आहेत. लोकलच्या २० ते २५ टक्केच फेऱ्या सुरु राहतील.
देशात जनता कर्फ्यूच्या दिवशी म्हणजेच २२ मार्चला आर्थिक राजधानी मुंबई, राजधानी दिल्लीसह कोलकत्ता, चैन्नई आणि सिकंदराबाद येथे लोकल सेवा सुरु असतील.