Sun. May 16th, 2021

इटलीहून चंद्रपूरला परतलेल्या नागरिकाला कोरोनाची लागण

जगभरातील अनेक देशांमध्य थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसने भारतात ही शिरकाव केल्याची शक्यता वर्तवल्यानंतर देशातील सर्वच यंत्रणा खडबडून जाग्या झाल्या आहेत. नाशिकमध्ये देखील कोरोना व्हायरस असलेल्या देशांमधून आलेल्या आठ लोकांपैकी एका व्यक्तीला कोरोना व्हायरसची लक्षणं आढळून आल्यान खळबळ उडाली आहे.

मूळचा चंद्रपूरचा असलेला हा इसम 26 फेब्रुवारीला इटलीहून भारतात आला होता. मात्र भारतात आल्यानंतर त्याला कोरोनाची कोणतीच लक्षण नसल्यानं त्याला आपल्या घरी सोडण्यात आले होते. मात्र ४ दिवसांनी त्याला दम लागणे, खोकला आणि ताप अशी कोरोनाची लक्षण आढळून आली. त्यानंतर त्याला तातडीने नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आलं.

यापूर्वीही कोरोना व्हायरस असलेल्या देशांमधून 8 नागरिक भारतात आले होते. पण त्यातील एकाही नागरिकात ही लक्षणं आढळून आली नाहीत.

मात्र या एका इसमाला ही लक्षणं आढळून आल्यानं आरोग्य यंत्रणाची झोप उडालीय. नाशिकच्या जिल्हा रुग्णालयातिल कोरोना कक्षात वरिष्ठ डॉक्टरांच्या निगराणीखाली या इसमावर उपचार सुरू असून त्याच्या घशाचे नमुने वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. या नमुन्यांचा अहवाल आल्यानंतरच पुढील दिशा ठरवली जाईल अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *