Thu. Jan 20th, 2022

मुंबईत सलग दुसऱ्या दिवशी कोरोना रुग्णसंख्येत घट

देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. तर सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळत आहेत. दरम्यान मुंबईतील कोरोना रुग्णांचा आकडा वरचढ आहे. मात्र गेल्या दोन दिवसांपासून मुंबईतील कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होताना दिसत आहे. मुंबईत सलग दुसऱ्या दिवशी कोरोना रुग्णसंख्या कमी झालेली पाहायला मिळालेली आहे.

मुंबईत सोमवारी आढळलेल्या कोरोना रुग्णांच्या तुलनेत मंगळवारी कोरोना रुग्णसंख्येत २ हजारांची घट झालेली आहे. मुंबईत मंगळवारी ११ हजार ६४७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर १४ हजार ९८० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सलग दुसऱ्या दिवशी मुंबईत कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाल्यामुळे आरोग्य प्रशासनाला काही अंशी दिलासा मिळाला आहे.

कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर राज्यात नवे निर्बंध लागू करण्यात आले आहे. तर मुंबईत नागरिक कोरोना नियमांचे पालन करत असल्याचे मुंबईचे महापौर किशोरी पेडणेकर यांनी पत्रकार परिषद घेत सांगितले आहे. तसेच नागरिकांनी काळजी घेत कोरोना लसीकरण पूर्ण करून नागरिकांनी कोरोना चाचण्या वाढवण्यावर भर देण्याचे आवाहनही किशोरी पेडणेकर यांनी केले आहे. कालपासून आरोग्य कर्मचाऱ्यांना बूस्टर डोस देण्यास सुरूवात झाली असून नागरिकांनी बूस्टर डोस घेण्यास चांगला प्रतिसाद दिला असल्याचेही किशोरी पेडणेकर यांनी सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *