Mon. Aug 15th, 2022

चीन, हाँगकाँगमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढले

केंद्रीय आरोग्य मंत्र्यांचा सतर्कतेचा इशारा

चीन, हाँगकाँग आणि सिंगापूरमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. तसेच कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर चीनच्या काही भागांमध्ये टाळेबंदी लावण्यात आली आहे. ओमिक्रॉनचा सबव्हेरिएंट असलेल्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव चीनमध्ये वाढला असून जगात पुन्हा एकदा वाढत असलेल्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर भारत सरकार सतर्क झाले आहे. तर केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. मनसुख मांडविय यांनी आरोग्य प्रशासनाला सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.

कोरोनाचा नवा व्हेरिएंट बीए.२ धोकादायक

चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोना विषाणूने डोकं वर काढल्यामुळे काही भागांमध्ये लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. अशातच आता, कोरोनाचा नवा व्हेरिएंट बीए.२ने जगभराची चिंता वाढवली आहे. तर या विषाणूमुळ जागतिक आरोग्य संघटनेने सर्व देशांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. तसेच बीए.२ हा व्हेरिएंट धोकादायक असल्याचेही जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.