Sun. May 16th, 2021

महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या ६४ वर

महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या वाढली आहे. आता राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ६४ वर गेली आहे. एकाच दिवसांत रुग्णाची संख्या १२ ने वाढल्यामुळे राज्यासाठी निश्चितच काळजीच कारण आहे. कोरोनाची लागण झालेल्यांपैकी एकजण विमानतळावरील कर्मचारी आहे. तसंच एक पुण्यातील महिला आहे.

महाराष्ट्र शासनाच्या वतीने घरातून बाहेर न पडण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. अनेकजण तरीही हे आवाहन पाळताना दिसत नाहीत. २२ मार्च रोजी जनता कर्फ्यूचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. कुणीही विनाकारण घराबाहेर पडू नये, असं जनतेला सूचित करण्यात आलंय.

मुंबई, नवी मुंबई, रायगड, ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवड, अहमदनगर, यवतमाळ, औरंगाबाद, रत्नागिरी, उल्हासनगर, कल्याण, नागपूर अशा विविध शहरांत कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत.

कुठे किती रुग्ण?

पुणे- ११

पिंपरी-चिंचवड- १२

मुंबई – १९

नागपूर- ४

यवतमाळ-

नवी मुंबई- ३

अहमदनगर- २

कल्याण- ४

ठाणे- १

उल्हासनगर- १

रत्नागिरी- १

पनवेल- १

औरंगाबाद- १

एकूण- ६४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *