पुण्यात दुसऱ्या दिवशीही कोरोना रुग्णांचा मृत्यू नाही

पुण्यात सलग दुसऱ्या दिवशीही एकाही कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. गुरुवारी झालेल्या पडताळणीत पुण्यात केवळ ७९ कोरोना रुग्णांची नोंद झाली. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या घटत असून सलग दुसरा दिवसही पुण्यासाठी कोरोनामुक्तीचा ठरला आहे.
गेले दीड वर्षे पुण्यासह अनेक शहरांत कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत होती. तर कोरोना मृत्यूदरही चागंलाच वाढत होता. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ६ फेब्रुवारी २०२१ रोजी पुण्यात एकही मृत्यू झाला नव्हता. आणि आता आठ महिन्यांतर पुण्यामध्ये एकाही कोरोना रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.
पुण्यात गुरुवारी दिवसभरात ८३ नागरिक कोरोनामुक्त झाले असून सक्रिय रुग्ण संख्या ९८४ इतकी झाली आहे. सक्रीय रुग्णांपैकी १६१ रुग्णांवर ऑक्सिजन उपचार सुरू असून १६३ कोरोनाबाधित गंभीर अवस्थेत आहेत. पुण्यात आजपर्यंत ९ हजार ६७ नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.