राज्यात रक्ताचा तुटवड्याचा धोका, रक्तदान करण्याचं आरोग्यमंत्र्यांचं आवाहन

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज 23 मार्च माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कोरोनासंदर्भातील अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली. दरम्यान याावेळेस आरोग्यमंत्र्यांनी राज्यात रक्ताचा तुटवडा होण्याचा धोका व्यक्त केला आहे.
काय म्हणाले आरोग्यमंत्री ?
आरोग्यमंत्र्यांनी जनतेला रक्तदान करण्याचं आवाहन केलं आहे. राज्यातील कोरोना रुग्णांचा आकड्यात वाढ होतेय. त्यामुळे या कोरोनाग्रस्त रुग्णांना या रक्ताची गरज भासणार आहे. परंतु रक्तदान करण्यासाठी गर्दी करुन येऊ नका.
रक्तदानाच्या वेळी ठराविक अंतर ठेवा. तसेच रक्तदान केल्याने कोरोना होत नाही, असंही आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले.
गर्दी केल्यास कारवाई – राजेश टोपे
महाराष्ट्रात आजपासून जमावबंदी लागू केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला आहे. कोरोना पादुर्भाव टाळण्यासाठी जनतेला घरी बसण्याचं आवाहन केलं आहे. मात्र काही अतिउत्साही लोकं चारचाकी घेऊन मूळगावी निघाले आहेत. त्यामुळे या अशा लोकांवर पोलिसांकडून कारवाई केली जाईल, असं आरोग्यमंत्री म्हणाले.
#Corona : संचारबंदी लागू करा, जितेंद्र आव्हाडांची मुख्यमंत्र्यांना विनंती
दरम्यान राज्यात आजपासून जमावबंदी लागू करण्यात आली आहे. जमावबंदीनुसार एका ठिकाणी 5पेक्षा अधिक लोकांना ठरवून जमता येत नाही. त्यामुळे या कायद्याचं उल्लंघन करणाऱ्यांवर 144 नुसार कारवाई केली जाणार आहे.
महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकड्यात दिवसेंदिवस वाढ होत आहे. राज्यात ताज्या आकडेवारीनुसार आतापर्यंत 89 कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. तर राज्यात कोरोनामुळे 3 जणांचा मृत्यू झाला आहे.
#Corona : सरकार गंभीर असेल तर जनता गंभीर होईल, संजय राऊतांचा निशाणा
दरम्यान आरोग्य मंत्र्यांनी मुंबई येथील लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने सुरू असलेल्या रक्तदान शिबिराला भेट दिली.
राज्यातील जनतेने या मंडळाचे अनुकरण करून रक्ताचा झालेला तुटवडा भरून काढण्यासाठी विनंती केली. याबाबतची माहिती आरोग्यमंत्र्यांनी ट्विटद्वारे दिली.