Tue. Jun 15th, 2021

मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी

मुंबई: देशात कोरोना रुग्णांच्या आकड्यात दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. प्रशासकीय यंत्रणा, आरोग्य यंत्रणा कॉर्नला आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत.मात्र या काळात एक दिलासादायक माहितीदेखील समोर आली आहे.
राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असले तरी कोरोना रुग्ण बरे होण्याचा आकडा सुधारत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. मुंबई महानगरपालिकेनं गुरुवारी प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, शहरात ८०९० जण दिवसभरात कोरोनमुक्त झाले आहेत. तर, ७४१० नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली. यावेळी रुग्णसंख्या दुपटीचा वेग हा ५० दिवस इतका झाला आहे.

शुक्रवारी पालिका प्रशासनानं प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार २४ तासांत ७२२१ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली, तर तब्बल ९५४१ कोरोना रुग्णांनी या विषाणूवर मात केली. आता एकूण कोरोनातून सावरणाऱ्या रुग्णांचा दर ८४ टक्क्यांवर पोहोचला आहे. तर, रुग्ण दुप्पटीचा दर ५२ दिवसांवर पोहोचला आहे. कोरोाग्रस्तांचे बरे होण्याचे हे आकडे पाहता मुंबईत हेच चित्र कायम राहिल्यास मुंबई शहर पुन्हा कोरोना नियंत्रणात आणण्यात यशस्वी ठरेल, असं म्हटलं जात आहे.

संपादन- सिद्धी भरत पाटील

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *