Mon. Jan 24th, 2022

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक लोकार्पण सोहळ्यात कोरोना नियमांची पायमल्ली

नवी मुंबईतील ऐरोली येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचा लोकार्पण सोहळा नुकताच पार पडला. मात्र या स्मारकाच्या लोकार्पण सोहळा कार्यक्रमात सोशल डिस्टनसिंगचा फज्जा उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

समारोहाच्या व्यासपीठावर ठाण्याचे पालकमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, झोपडपट्टी सुधार समितीचे अध्यक्ष विजय नाहटा, सोबतच नवी मुंबई मनपा आयुक्त अभिजित बांगरदेखील उपस्थित होते. राज्यात कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉनचा शिरकाव झाला असून रुग्णांमध्ये वाढ होत आहे. असे असताना, राज्यातील सत्ताधारी पक्षातील नेते मंडळीच नियमांची पायमल्ली करत असतील तर समान्यांकडून नियमांच्या अंमलबजावणीची अपेक्षा का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ६५वा महापरिनिर्वाण दिन आहे. महापरिनिर्वाण दिनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी नवी मुंबईतील ऐरोली येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचा लोकार्पण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याला ठाण्याचे पालकमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, झोपडपट्टी सुधार समितीचे अध्यक्ष विजय नाहटा, नवी मुंबई मनपा आयुक्त अभिजित बांगर उपस्थित होते. मात्र या सोहळ्याला कोरोना नियमांचा फज्जा उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *