Tue. Dec 7th, 2021

राज्यात ‘या’ ठिकाणी कोरोना संशयित महिलेचा मृत्यू

राज्यात कोरोना संशयिताचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापुरात कोरोना संशयिताचा मृत्यू झाला आहे. कोरोना संशयित महिलेवर उपचार सुरु असताना मृत्यू झाला आहे.

या ६८ वर्षीय महिलेचा रविवारी संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास मृत्यू झाला.मृत महिला 68 वर्षांची होती. ही मृत महिला मूळची हरियाणा येथील होती.

सीपीआरमधील कोरोना कक्षात या महिलेची तपासणी झाली होती. त्या व्यक्तीचा स्वॅबचा नमुना पुण्यातील राष्ट्रीय विषाणू तपासणी प्रयोगशाळेत पाठवण्यात आला आहे. अहवाल येण्याआधीच महिलेचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान, संबधित व्यक्तीला श्वसनसंस्थेचा विकार होता. त्यांनी कोल्हापूर ते हरियाणा आणि हरियाणा ते कोल्हापूर असा प्रवास केला होता.

राष्ट्रीय विषाणू तपासणी प्रयोगशाळेतून स्वॅब तपासणीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे. संबंधित व्यक्ती कोल्हापूर शहरानजीकच्या एका गावातील असल्याचं समजत आहे.

दरम्यान देशात कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा 100 च्या पार गेला आहे. तर सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण महाराष्ट्रात आहेत. राज्यात एकूण 33 कोरोनाचे रुग्ण आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. मुंबईत 31 मार्चपर्यंत ही जमावबंदी लागू असणार आहे.

तसेच राज्यातील शाळा महाविद्यालयांना देखील 31 मार्चपर्यंत सुट्टी जाहीर केली आहे.

खबरदारीचा उपाय म्हणून नियोजित कार्यक्रम पुढे ढकलण्यात आले आहेत. MPSC च्या परीक्षा देखील 31 मार्चपर्यंत स्थगित करण्यात आल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *