Thu. Dec 2nd, 2021

अभिनेत्री उर्मिला मातोंडकरला कोरोनाची लागण

   बॉलीवूड अभिनेत्री तसेच शिवसेना नेते उर्मिला मातोंडकर यांना कोरोनाची लागण झाली आहे. उर्मिला मातोंडकर यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे.

  उर्मिला मातोंडकर यांनी ट्विट केले की, ‘माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून मी आता ठीक आहे. सध्या मी विलगीकरण कक्षात असून माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी त्वरीत कोरोना चाचणी करावी. तसेच दिवाळी सणात सर्वांनी काळजी घेण्याचे आवाहन’ उर्मिलाने ट्विट करत केले आहे.

  अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने बॉलिवूडसह अनेक चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारल्या आहेत. नरसिम्हा हा उर्मिलाचा सर्वात पहिला चित्रपट आहे. मात्र गेल्या वर्षी उर्मिलाने शिवसेना पक्षात प्रवेश केला. रंगीला, प्यार तुने क्या किया, पिंजर यासारख्या अनेक चित्रपटातील विविध भूमिका साकारून उर्मिलाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *