२ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांचं लसीकरण?

देशात कोरोनानं थैमान घातलं असून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत लहान मुलांना लागण होण्याचं प्रमाण वाढत असल्याचं समोर आलं. कोरोना महामारीविरोधातील या लढाईत आता २ ते १८ या वयोगटातील मुलांसाठी येत्या काही दिवसात चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे.

एका तज्ज्ञ समितीने मंगळवारी भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन या स्वदेशी कोरोना प्रतिबंधक लसीची २ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांवर चाचणीसाठी शिफारस करण्यात आली आहे. दुसऱ्या तसेच तिसऱ्या टप्प्यातील चाचणीसाठी ही शिफारस करण्यात आली आहे.

ही चाचणी महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर येथील मेडिट्रिना मेडिकल सायन्स इन्स्टिट्यूट, दिल्ली तसेच पाटण्यातील एम्ससह विविध ठिकाणी करण्यात येणार आहे.

Exit mobile version