Jaimaharashtra news

सोसायट्यांमध्ये लसीकरण करण्यास पालिकेचा हिरवा कंदील

मुंबई: कोरोनावरील लस आता तुम्हाला तुमच्या सोसायटीतच घेता येणार आहे. यासाठी केंद्राकडून हिरवा कंदील मिळाल्यामुळे पालिकेनेही सोसायटय़ांना खासगी रुग्णालयांच्या माध्यमातून असा उपक्रम राबवण्यास परवानगी दिली आहे. लसींचे डोस उपलब्ध झाल्यानंतरच हा उपक्रम सोसायटय़ांना राबवता येणार आहे.

पालिकेने आत्तापर्यंत ७५ पेक्षा अधिक खासगी रुग्णालयांना सोसाट्यांमध्ये लसीकरण केंद्र उभारण्याची परवानगी दिली असून यात अजून रुग्णालयांची भर पडणार आहे. परंतु लसीकरणादरम्यान सोसायट्यांमधील नागरिकांना लस घेतल्यानंतर निरीक्षणाखाली ठेवत योग्य काळजी घ्यावी लागणार आहे. तसेच पालिकेने लसीकरणासाठी ठरवून दिलेल्या नियमांचे योग्य पालन करावे लागणार आहे.

दरम्यान ज्या नागरिकांना मोफत लस हवी आहे अशांसाठी पालिकेने २२७ नवीन केंद्रे सुरु केली आहेत. परंतु या केंद्रावर पुरेसा लसीचा साठा उपलब्ध झाल्यानंतर नागरिकांना विनामूल्य लस मिळणार असल्याची माहिती महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकानी यांनी दिली आहे.

Exit mobile version