Tue. Oct 26th, 2021

१२ ते १८ वयोगटातील मुलांवरील चाचणी यशस्वी

नागपुर: लहान मुलांच्या कोरोना लसीकरणाच्या चाचणीला सुरवात झाली आहे. भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन लसीच्या लहान मुलांच्या चाचणीमध्ये ६ ते १२ या वयोगटातील मुलांना लस देण्यास आजपासून सुरुवात झाली आहे. नागपुरातील मेडीट्रीना इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस या रुग्णालयात कोवॅक्सिनचे लहान मुलांसाठीची दुसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरू झाली आहे. ६ जून रोजी १२ ते १८ वयोगटातील ४० मुलांना लस देण्यात आली होती. या वयोगटातील मुलांच्या लसीकरणानंतर कोणालाही त्याचे दुष्परिणाम झाले नाहीत. त्यामुळे आता ६ ते १२ वयोगटासाठी लसीकरण सुरू करण्यात आली आहे. यामध्ये २० मुलांना लस देण्यात आली आहे. यानंतर काही दिवसांनी २ ते ६ या वयोगटासाठी लसीकरण सुरू केले जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *