Wed. Jun 16th, 2021

Corona : रायगडमधील कलिंगडाच्या पिकाला कोरोनाचा फटका

रायगड जिल्ह्यामध्ये कलिंगडाचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. रायगडमधील पेण, रोहा, माणगाव, महाडमधील या कलिंगडाला महाराष्ट्रातून मागणी असते. मात्र कलिंगडाला कोरोनाच्या संसर्गामुळे लागलेल्या संचारबंदीचा मोठ्ठा फटका बसला असून विक्रीसाठी तयार कलिंगडाला ग्राहक मिळत नसल्याने कलिंगड शेतात खराब होत आहे.

रायगडमधील पेण, रोहा, माणगाव, महाडमध्ये अडीचशे तीनशे हेक्टरमध्ये कलिंगडाची शेती केली जाते. केवळ दोन महिन्याच्या कालावधीतील हे पीक असून ग्राहक मिळाला नाही, पाणी कमी पडले अगर उन्हाचा पारा वाढला तरी या पिकाला फटका बसतो.

या वर्षी कलिंगड उत्पादक शेतकऱ्यांना कोरोना व्हायरसच्या संसर्गाला अटकाव करण्यासाठी लावलेल्या संचारबंदीचा फटका बसला आहे. याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी सचिन कदम यानी

संचारबंदी लागू असल्यामुळे कलिंगडाच्या वाहतुकीसाठी वाहन आणि विक्रीसाठी ग्राहक देखील मिळत नाही. त्यामुळे शासनाने कलिंगड उत्पादक शेतकऱ्यांची सहानूभुती पुर्वक विचार करावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

तर कलिंगड उत्पादक शेतकऱ्यांसह इतर शेतकऱ्यांनी संचारबंदी काळात आपला शेतमाल विक्रीसाठी प्रशासनाकडे परवानगी मागावी ती तातडीने दिली जाईल अशी प्रतिक्रिया महाडचे उपविभागीय अधिकारी विठ्ठल इनामदार यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *