Mon. Dec 6th, 2021

Corona Virus : कशी असेल टाळेबंदी?

 Corona Virus चं संकट वाढत असल्याचं पाहून अखेर राज्य शासनाने टाळेबंदीचा निर्णय घेतला आहे. मात्र ताळेबंदी म्हणजेच ‘लॉकडाऊन’ म्हणजे नेमकं असतं काय? या काळात नेमकं काय काय बंद असतं आणि काय काय सुरू असतं? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यासंदर्भात निर्देश दिले आहेत. कोरोनाचा संसर्ग टाळण्याचा विचार करून शासनाने काही गोष्टी पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार पुढील गोष्टी बंद असतील-

मुंबई लोकल ट्रेन्स बंद, केवळ मालवाहू गाड्या सुरू राहतील

मुंबईमध्ये बेस्टच्या बसेसदेखील सर्वसामान्य नागरिकांसाठी बंद असतील. केवळ अत्यावश्यक सेवा पुरवठादारांपुरतीच ही सेव असेल.

परदेश प्रवास करून येणाऱ्यांवर तसंच आंतरराष्ट्रीय प्रवास तात्पुरता बंद असेल

मॉल, थिएटर्स, मल्टिप्लेक्स बंद असतील

शाळा, कॉलेज बंद असतील.

खासगी कार्यालयंही आता बंद असतील. कर्मचाऱ्यांना Work from Home ची सुविधा असेल.

या काळात जीवनावश्यक वस्तूंची दुकानं मात्र सुरू राहतील.

धान्य, भाजीपाला, किराणा मालाची दुकानं सुरू असतील

औषधालयं सुरू राहतील. तसंच बँका, शेअर बाजार आणि वित्तीय संस्था सुरू राहतील

विद्युतपुरवठा कार्यलयं सुरू असतील.

शासकीय कार्यालयात यापूर्वी कर्मचाऱ्यांची उपस्थिती ५०%  करण्यात आली होती. ती नंतर २५% करण्यात आली. आता ही उपस्थिती ५ टक्क्यांपर्यंत घटवण्यात आली आहे.  

धार्मिक प्रार्थनास्थळांमध्ये पूजाअर्चेला परवानगी आहे. मात्र प्रार्थनास्थळं दर्शनासाठी बंद असतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *