रेल्वे पोलिसाला कोरोनाची लागण

राज्यात कोरोना विषाणूने थैमान घातलं आहे. कोरोनामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. मात्र अत्यावश्यक सेवा देणार कर्मचारी आपली भूमिका पार पाडत आहे. लॉकडाऊन च्या परिस्थितीत पोलिसांना अधिक जबाबदारीने काम करावं लागत आहे. यातच आता रेल्वे पोलीसाला कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळत आहे.
कोरोनाचू लागण झालेले रेल्वे पोलीस हवालदार हे छशिमट रेल्वे स्थानकात कार्यरत आहेत. यांचा कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. हे हेवालदार कल्याण पश्चिम येथे राहतात.
या पोलीस हवालदाराला 30 मार्चला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. तसेच सतत खोकला येऊ लागला. त्यामुळे कल्याण येथील रुक्मिणीबाई रुग्णालयात त्यांना दाखल केले. मात्र डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यास सांगितले. येथे उपचार घेतल्यावर अहवाल पॉझिटिव्ह आला.
चाचणी पॉझिटिव्ह आली. यामुळे त्यांच्या 15 मार्च ते 27 मार्चच्या कालावधीत संपर्कात आलेल्या पोलिसांचीही चाचणी केली जात आहे. एकूण 25 पोलिसांची देखील तपासणी केली जात आहे. संपर्कात आलेल्या 25 पोलीस कर्मचाऱ्यांना कस्तुरबा रुग्णालयात क्वॉरंटाईन करण्यात आले आहे.