कोरोनाचा देशात चौथा बळी

कोरोनाचा देशात आणखी एक बळी गेला आहे. 19 मार्च रोजी पंजाबमध्ये एका कोरोनाग्रस्ताचा मृत्यू झाला आहे. यापूर्वी कर्नाटक, नवी दिल्ली आणि महाराष्ट्रात कोरोनाग्रस्त रुग्णांचे मृत्यू झाले होते. देशात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढत आहे. महाराष्ट्रात कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या सर्वाधिक आहे.
पहिला मृत्यू कर्नाटक येथे 76 वर्षीय वृद्धाचा मृत्यू – 11 मार्च
दुसरा मृत्यू दिल्ली येथे 69 वर्षीय महिलेचा मृत्यू – 13 मार्च
तिसरा मृत्यू मुंबई येथे 64 वर्षीय वृद्धाचा मृत्यू – 17 मार्च
चौथा मृत्यू पंजाब येथे कोरोनाग्रस्त रुग्णाचा मृत्यू– 19 मार्च
पंजाबमध्ये कोरोनाग्रस्त रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर आता पंजाब सरकारने 20 मार्चपासून सर्व सरकारी आणि खासगी बस वाहतूक बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. जमावबंदीचे आदेशही देण्यात आले आहेत. परीक्षादेखील स्थगित करण्यात आल्या आहेत.
Corona Virus चा संसर्ग रोखण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. पंजाब, प. बंगाल येथे सारव्जनिक वाहतूक बंद करण्यात आली आहे. मात्र महाराष्ट्रात अद्याप मुंबई लोकल सुरू आहेत. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने यासंदर्भात माहिती जारी केली आहे. रेस्टोरंट्स, व्यायामशाळा, शाळा, कॉलेज बंद ठेवण्यास सांगितलेलं आहे.