Sat. Jul 31st, 2021

कोरनाचा आकडा शंभरी पार

कोराना विषाणूने भारतात शंभरी पार केली आहे. आतापर्यंत कोरोना रुग्णांचा आकडा १०८ वर पोहचला आहे. या १०८ पैकी ११ रुग्णांची प्रकृतीत सुधारणा झाली आहे.

तर २ जणांचा मृत्यू झाला आहे. भारतात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण महाराष्ट्रात आहेत. राज्यात आतापर्यंत ३२ वर पोहचली आहे. कोरोनाला महामारी घोषित केली आहे.

कोरनोच्या पार्श्वूभूमीवर सरकारतर्फे मोठ्या प्रमाणात खबरदारीच्या उपायांचा अवलंब केला जात आहे. मुंबईत जमावबंदी आदेश लागू करण्यात आले आहेत.

म्हणजेच एका ठिकाणी ५ पेक्षा अधिक जणं जाणीवपूर्वक जमू शकत नाही.

कोरोना विरुद्ध केंद्र सरकारने देखील दंड थोपाठले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज सार्क देशासोबत व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे कोरोना विरुद्ध निदानासाठी चर्चा करण्यात येणार आहे.

कोरोनाने संपूर्ण जगभरात हाहाकार माजवला आहे. अमेरिका कोरोनाच्या दहशतीखाली आहे. तर युरोपात चीनपेक्षा गंभीर परिस्थिती आहे. दरम्यान तेलंगणामध्ये २ कोरोनाग्रस्त रुग्णांची प्रकृती आहे.

भारतात कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसागणिक वाढत आहे.

चार राज्याने कोरोनाला राष्ट्रीय आपत्ती घोषित केलं आहे.यामध्ये दिल्ली, हरियाणा, उत्तराखंड आणि गुजरात या राज्यांचा समावेश आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नाट्यगृह, जिम, मॉल्समध्ये शुकशुकाट पाहायला मिळत आहे.

तसेच शाळा महाविद्यालांना ३१ मार्चपर्यंत सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. कोरोनामुळे अनेक महत्वाचे शासकीय कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *