Mon. Dec 6th, 2021

यंदाही गणेश मूर्तिकारांसमोर कोरोनाचे विघ्न

कोरोनाचे संकट लक्षात घेत राज्य सरकारने गणेशोत्सवासाठी मार्गदर्शक तत्वे जाहीर केली आहेत. त्यानुसार सार्वजनिक गणेशोत्सवासाठी मूर्तीच्या उंचीची मर्यादा ४ फुटांची ठेवण्यात आली असून घरगुती गणपतीची मूर्ती ही २ फुटांची ठेवण्यात आली आहे. नागरिकांची गर्दी होऊ नये या अनुषंगाने गणपतीचे दर्शन ऑनलाईन पद्धतीने ठेवावे, अशीही राज्य सरकारची सूचना आहे. परंतु याचा जबरदस्त फटका गणेश मुर्तीकारांना बसला आहे. यंदा सार्वजनिक गणेश मूर्तींच्या आकाराची मर्यादा ४ फुटांपर्यंतच असल्याने अनेक सार्वजनिक गणेश मूर्तीशाळा बंद पडल्याचे पहायला मिळत आहे. त्यामुळे गणेश मूर्तिकार मोठ्या संकटात सापडले आहेत. दरवर्षी गणेश मूर्तीशाळेवरच या मूर्तिकारांच्या पूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत आहे. वर्षभराची सर्व गणिते यावरच अवलंबून असतात. दरवर्षी ज्याठिकाणी ७०० मुर्त्या घडवण्यात येत होत्या त्याठिकाणी गेल्यावर्षीपासून केवळ तीनशे ते साडेतीनशे मूर्त्यांची विक्री होत असल्याने हा व्यवसाय जवळपास अर्ध्यावरच आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *