Mon. Jan 17th, 2022

नाशिकमध्ये कोरोनाचा वाढता आलेख सुरूच

राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ होताना दिसत आहे. तर नाशिकमध्ये कोरोनाचा वाढता आलेख सुरूच आहे. गेल्या २४ तासांत नाशिकमध्ये २१६ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे तर सर्वाधिक रुग्ण १५१ रुग्णांची शहरात नोंद झाली आहे.

दंत महाविद्यालयातील दहा मुली कोरोनाबाधित

नाशिकमधील पंचवटीतील दंत महाविद्यालयाच्या वसतिगृहातील आणखी दहा विद्यार्थ्यांनी कोरोनाबाधित असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे वसतिगृहातील कोरोनाबाधितांची संख्या २७वर पोहचली आहे. कोरोनाबाधित विद्यार्थिनींवर विलगीकरणात उपचार सुरू असून त्यांच्या उपचार आणि देखरेखीसाठी महाविद्यालय प्रशासनाकडून २ स्वतंत्र्य डॉक्टरांची नेमणूक करण्यात आली आहे.

नाशिकमध्ये कोरोना रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. त्यामुळे प्रशासन चिंतेत आले असून नागरिकांनी नियम पाळण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन करण्यात येत आहे. तर नागरिकांनी नियम न पाळल्यास गंभीर परिस्थिती निर्माण होईल, असा इशारा जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी दिला आहे.

नागपुरमध्ये कोरोना रुग्णसंख्येत वाढ

नागपूर जिल्ह्यामध्ये रुग्ण संख्येत सातत्याने वाढ होत असल्यामुळे कोरोना नियम न पाळणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या सभेत घेण्यात आला आहे.

मास्क न वापरणाऱ्या नागरिकांना ५०० रूपये दंड, परवानगीपेक्षा अधिक गर्दी असणाऱ्या ठिकाणी आस्थापनांवर १० हजार रुपये दंड, मंगल कार्यालयात गर्दी दिसल्यास ५० हजार रुपये दंड आकारण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाने आदेशात दिले आहेत. याशिवाय वाढती रुग्ण संख्या बघता सर्व प्रमुख रुग्णालयामधील पूरक यंत्रणा तयार ठेवण्याबाबतही निर्देश देण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *