Wed. Oct 5th, 2022

‘कोरोनाचे खापर महाराष्ट्रावर फोडणे हा अपमान’ – संजय राऊत

देशभरात कोरोना पसरण्यासाठी महाराष्ट्र जबाबदार असल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राज्यसभेत केला. यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधानांना प्रत्युत्तर दिले असून हा महाराष्ट्राचा अपमान असल्याचे संजय राऊत म्हणाले.

संजय राऊत म्हणाले, कोरोनाचे खापर महाराष्ट्रावर फोडणे हा महाराष्ट्राचा अपमान असल्याचे राऊत म्हणाले. पंतप्रधानांनी महाराष्ट्रासंदर्भात केलेल्या उल्लेखावर महाराष्ट्र सरकारने खुलासा केला पाहिजे. कोरोना महामारीचा उगम चीनमधून झाला. मात्र, कोरोना महामारीचे खापर महाराष्ट्रावर फोडले आहे. महाराष्ट्र सरकार कसे काम करते याचे दाखले उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयाने इतरांना दिले होते. त्यामुळे हुतात्म्य पत्करले त्यांचा आणि महाराष्ट्राचा अपमान आहे, असे संजय राऊत आहे. तसेच कोणत्याही हल्ल्याचे आम्ही समर्थन करणार नाही, असेही संजय राऊत म्हणाले.

तसेच, अभिनेता सोनू सूदचा राजभवनात राज्यपालांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यामुळे सोनू सूद नागरिकांना बाहेर पाठवत आहे असे म्हणत त्यांचे कौतुक करणारे कोण होते? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. आम्ही त्यावेळी घाई करू नका, असे म्हणाले होतो, त्यामुळे याप्रकरणी भूमिका राज्य सरकारने मांडली पाहिजे, असेही संजय राऊत म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले…

कोरोनाच्या पहिल्या लाटेदरम्यान देशात सर्वत्र टाळेबंदी करण्यात आली. मात्र, महाराष्ट्रातील काँग्रेस नेते मुंबई सोडून जाणाऱ्यांना रेल्वे तिकीट उपलब्ध करून देत होते. त्यामुळे काँग्रेसनेच नागरिकांना स्थलांतरित करण्यासाठी प्रवृत्त केले. महाराष्ट्रावरील परप्रांतीयांचे ओझे कमी होईल तसेच तुम्ही उत्तर प्रदेश, बिहारचे आहेत त्यामुळे तिथे जाऊन कोरोना पसरवण्याचे काम करा, असा संदेश काँग्रेस नेत्यांनी दिला. त्यामुळे महाराष्ट्रामुळेच देशात कोरोना पसरला असल्याचा आरोप, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे.

1 thought on “‘कोरोनाचे खापर महाराष्ट्रावर फोडणे हा अपमान’ – संजय राऊत

  1. Thanks for giving this particular good written content on your website. I came across it on the internet. I may check to come back when you post extra aricles.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.